क्राईम:शनिशिंगणापुरात मारामारी, चार जणांवर गुन्हा दाखल
दीपावलीनिमित्त शिंगणापूर येथे फटाके वाजवल्याच्या किरकोळ झालेल्या वादातून शनी शिंगणापूर येथील रहिवासी स्वप्निल लक्ष्मण बानकर, वय २२ यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी घोडेगाव येथील किरण रामदास जाधव, दादासाहेब बाबासाहेब गिऱ्हे, बुट्या भांडलकर, हर्षल जाधव व एका अनोळखी विरोधात शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. झालेल्या घटनेच्या संदर्भात बानकर यांनी दिलेल्या फिर्यादीत हर्षल जाधव बरोबर झालेला वाद हा मालक विकास बानकर यांनी मिटवला असतानाही काही वेळाने चार चाकी मोटार मधून आलेल्या चार ते पाच जणांनी शिवीगाळ करून स्वप्नील बनकर यांना खाली पाडून मारहाण केली आहे. पुन्हा एकदा श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर या धार्मिक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचे निदर्शनात येत आहे.