महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम उत्साहात
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती प्रसंगी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बडनेरा शहर शाखेच्या वतीने व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम आधार बेघर शहरी निवारा (अमरावती महानगरपालिका अंतर्गत) येथे पार पडला. हा कार्यक्रम जागतिक बेघर सप्ताहाच्या निमित्ताने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेहमान शहा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप महल्ले, ज्योस्त्ना शेटे, नितीन बेदरकर यांनी व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन केले. यावेळी प्रफुल्ल कुकडे, विजय डवरे, दिलीप लाडे, भूमिका पहूरकर, ज्योती राठोड आदी उपस्थित होते.मार्गदर्शकांनी व्यसनाचे प्रकार, दुष्परिणाम, सामाजिक जीवनावरील परिणाम तसेच अंधश्रद्धा व व्यसन यातील संबंध स्पष्ट करत बेघर बांधवांना व्यसन मुक्तीचे मार्गदर्शन केले. पोस्टर व माहिती पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.यावेळी महिला विभागाच्या जागर स्त्री शक्तीचा सन्मान संकल्प अभियान अंतर्गत ज्योती राठोड यांना बेघर बांधवांसाठी केलेल्या कार्याबद्दल शॉल, पुस्तक व संविधान प्रास्ताविक कॅलेंडर देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्योस्त्ना शेटे यांचा व्यसन प्रबोधन कार्याबद्दल सत्कार झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदन खंडारे, दिलीप लाडे, रेहमान शहा यांच्यासह संचालक राजू बसवनाथे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन राजीव बसवनाथे यांनी केले तर आभार दिगंबर मेश्राम यांनी मानले.