Maharashtra

ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला:भाजपचा आरोप; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 ज...

भिवंडी कनेक्शन उघड!:संभाजीनगरात कॉलेज तरुणांना ड्रग्ज पुरवणारा शेख मिजान अटकेत; साथीदार फरार

शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. शेख मिजान शेख नईम (२७, रा. सिल्क मिल कॉलनी) असे अटकेतील आरोपी...

संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम

मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस य...

थर्टी फर्स्टला दारू पिऊन झिंगणाऱ्यांची गाढवावरून काढणार धिंड:अहिल्यानगरमधील निघोज गावातील महिलांचा टोकाचा इशारा

थर्टी फर्स्टचे निमित्त करून दारू पिऊन निघोज गावात फिरण्याचा बेत असेल तर सावधान! कारण झिंगाट होऊन गावात फिरणाऱ्या तळीरामांची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय गावातील महिलांनी घेतला आहे. गावात पूर्णपण...

भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदेगट:अमित शहांच्या दारात उभे राहणाऱ्यांना शिवसेना म्हणू नका; संजय राऊतांचा जोरदार हल्ला

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजप आणि शिंदे गटामधील जागावाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या...

संभाजीनगरात महायुतीचा पोपट मेला:भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच युती टिकू शकली नाही, संजय शिरसाट यांचा थेट आरोप

संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच ही युती टिकू शकली नाह...

आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस:पुण्यात भाजपा - शिवसेनेची युती तुटली? अजित पवारांच्या NCP ची गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्...

पिंपरी-चिंचवड निवडणुकीत अजित पवार उमेदवार:बातमी समोर येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का, नेमके कारण काय?

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखी आणि अनेकांना चकित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील राजकीय चर्चांना अचानक वेग आला आहे, कारण अजित पवार हे नाव असलेला उमेदवार थेट निवडणुकीच...

कोल्हापूर जिल्हा बँकेला RBIचा झटका:नियमभंग करणाऱ्या बँका, फायनान्स कंपनीवर लाखोंचा दंड; कर्ज व्यवहारातील नियमभंग उघड

देशातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. बँकिंग प्रणाली सुरक्षित, पारदर्शक आणि नियमांनुसार चालावी यासाठी आरबीआय वेळोवेळी तपासण्या कर...

मुंबईत ठाकरे बंधूंची महायुतीला कडवी टक्कर:राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी एका क्लिकवर; वाचा कोण कुठे मैदानात?

मुंबई महापालिका 2026 च्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारीला वेग दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आतापर्यंत 37 इच्छुक उमेदवारांना सं...

अजित पवारांच्या गुप्त बैठकींना यश:पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी अखेर एकत्र, महापालिकेची निवडणूक संयुक्तपणे लढणार, राजकारणाला कलाटणी

राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर पुण्याच्या राजकारणात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राजकीय हालचाली गुप्तपणे सुरू होत्या. नेते, पदाधिका...

युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला:भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राह...

छत्रपती संभाजीनगरात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा:राजेंद्र जंजाळांचे अश्रू पाहून कार्यकर्ते शिरसाटांच्या घराबाहेर जमा, युती तोडण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 24 तास शिल्लक असताना, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच चिघळला आहे. भाजपच्या पाचव्या प्रस्तावात शिवसेनेच्या ताब्य...

भाजपचा 'घराणेशाही'ला ब्रेक!:महापालिकेत आमदार-खासदारांच्या मुलांना तिकीट नाही; नाशिक, कोल्हापुरात बड्या नेत्यांच्या वारसांची माघार

नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. "पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा," या उद्द...

काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर:सर्वधर्मीयांना संधी देत जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न; वाचा कुणाला मिळाली संधी?

काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेद...

सांगलीत भाजपची कोंडी:हिंदुत्ववादी मतांची बँक समजल्या जाणाऱ्या धारकऱ्यांचे बंड, भिडे गुरुजींच्या समर्थकाकडून अपक्ष अर्ज दाखल

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2,869 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी होणारी निवडणूक विशेष चुरशीची ठरण्याची चिन्ह...