श्रीवर्धनमध्ये राजकीय भूकंप:विजयानंतर लगेच उद्धव ठाकरेंचा नगराध्यक्ष एकनाथ शिंदेंच्या गळाला, गोगावलेंनी केली होती पडद्याआडून मदत
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज (21 डिसेंबर) स्पष्ट होत असतानाच रायगड जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अतुल चौगुले दणदणीत बहुमताने निवडून आले...